डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ? | What is Digital Marketing?
डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ?
आजचा काळ हा पूर्णपणे तंत्रज्ञानामय झाला आहे. त्यातल्या नवीन नवीन शोधामुळें आपलं काम आणि एकंदरीत जीवन सोप्प झाल आहे. आणि याच तंत्रज्ञानाचा एक भाग म्हणजे इंटरनेट (Internet) किंवा सोप्या भाषेत म्हणायचं झाला तर मायाजाल. इथे दुनियाभरची माहिती आहे आणि ती तुम्हाला एका क्लिक वर उपलब्ध होते.
याच इंटरनेट (Internet) आणि त्यावरील प्लॅटफॉर्म चा वापर करून जेव्हा एखादा व्यवसाय चुटकीसरशी हजारो लोकांपर्यंत पोहचवला जातो तेव्हा त्याला इंटरनेट मार्केटिंग (Online marketing) किंवा डिजिटल मार्केटिंग (Digital marketing) अस हि म्हंटल जाते.
चालू घडीला डिजिटल मार्केटिंग (digital marketing) चा वापर आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहेत आणि त्याला कारणं हि तशीच आहेत. प्रत्येक कंपनी मग ती लहान असो वा मोठी अत्यंत हुशारीने या technology based मार्केटिंग पद्धतीचा वापर करत आहे.
पूर्वीच्या काळी आणि आता ही काही प्रमाणात जुन्या पद्धतीने मार्केटिंग केली जाते जसा कि टीव्ही, वृत्तपत्र, मासिके, रेडिओ, कागद, पोस्टर आणि बॅनर इत्यादी. पण विसाव्या शतकाच्या सुरवातीपासून जगभरात आणि २००७ -०८ नंतर भारतात internet चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. आणि उद्योगधंद्यांना डिजिटल मार्केटिंग चा स्वरूपात एक ग्लोबल प्लॅटफॉर्म मिळाला. ज्याचा वापर करून ते इंटरनेट चा माध्यमातून हजारो लोकांपर्यंत पोहचू शकले
विकिपीडियाच्या मते, जर आपण आपल्या सेवेचे किंवा कोणत्याही उत्पादनाची मार्केटिंग इंटरनेट सारख्या डिजिटल technology चा वापर करून विक्रीसाठी करत असू,तर त्याला डिजिटल मार्केटिंग असे म्हंटले जाते.
डिजिटल मार्केटींगचा फायदा काय ? (Benefits of digital marketing)
- डिजिटल मार्केटिंग चा वापर करून आपण कमी खर्चात आणि कमी वेळेमध्ये जास्त ग्राहकांपर्यंत पोहचू शकतो.
- डिजिटल मार्केटिंग मध्ये व्यावसायिक त्याची जाहिरात कोणाला दिसली पाहिजे हे ठरवू शकतो. ज्याला specific targeting असं ही म्हंटलं जातं. उदाहरणार्थ. डिजिटल मार्केटिंग चा वापरत करून मी माझा coaching classes साठी फक्त तरुणापर्यंत पोहचू शकतो किंवा फक्त त्यांना माझी जाहिरात (advertisement) दाखवू शकतो. हे जुन्या पद्धतीच्या मार्केटिंग मध्ये शक्य होत नाही.
- डिजिटल मार्केटिंग मुले कंपनी ची पत (Brand value) वाढते.
- डिजिटल मार्केटिंग चा मदतीने आपण आपल्या जवळच्याच नाही तर जगभरातील ग्राहकांपर्यंत पोहचू शकतो.
- आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे या कामासाठी कमीत कमी मनुष्यबळ लागतं
डिजिटल मार्केटींगचे प्रकार कोणते ?
डिजिटल मार्केटिंग मध्ये वेगवेगळ्या मार्केटिंग चा पद्धती येतात. इंटरनेट वरील वेगवेगळ्या प्लँटफॉर्म्स जसे कि search engine, social media, Emails यांचा वापर करून मार्केटिंग केली जाते. जसा कि सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO), सोशल मीडिया मार्केटिंग, ई-मेल मार्केटिंग , यूट्यूब मार्केटिंग, अफिलिएट मार्केटिंग, पे पर क्लिक (PPC) मार्केटिंग , अँप्लिकेशन मार्केटिंग इत्यादी.
डिजिटल मार्केटींग मधे करियर ?
आजच्या या डिजिटल युगात ,डिजिटल मार्केटींग मधे करियर करण्याची इच्छा असणाऱ्याला बऱ्याच संधी उपलब्ध आहेत. तसेच या क्षेत्रात career growth आणि salary package ही चांगले मिळते. तसेच कोणत्या हि पूर्व शिक्षणाची अट नाही. कोणी हि करू शकतो.
इंटरनेटद्वारे व्यवसाय करणार्या लाखो कंपन्या आहेत आणि त्यापैकी बर्याच जणांना डिजिटल मार्केटींग करता येणाऱ्या skilled manpower ची आवश्यकता असते. पर्यटन, बँकिंग, रिटेल, मीडिया, हॉस्पिटॅलिटी इत्यादी क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना हि त्यांचा डिजिटल मार्केटींग साठी डिजिटल मार्केटिंग मॅनेजरची आवश्यकता असते. तसेच परदेशी कंपन्यांमध्येही तुम्ही काम करू शकता. त्या साठी तुम्हाला डिजिटल मार्केटिंग चे knowledge , certification आणि जोडीला थोडा अनुभव हवा.
डिजिटल मार्केटिंग शिकल्यानंतर तुम्ही नोकरी करू शकता किंवा मग freelance डिजिटल मार्केटर म्हणून एखाद्या व्यवसायाच्या मार्केटिंग च कॉन्ट्रॅक्ट सुद्धा घेऊ शकता. किंवा मग Youtube , blogging आणि social media चा वापर करून घर बसल्या पैसे हि कमावू शकता.
डिजिटल मार्केटिंग फ्रेशर ज्याने नुकताच डिजिटल मार्केटिंग course complete केला आहे तो महिन्याला १२-१८ हजार इतका पगार कमावू शकतो. अनुभवी डिजिटल मार्केटिंग एक्स्पर्ट महिन्याला ३०-७० हजार कमावतात.
तुम्ही हि नोकरी चा शोधत असाल किंवा तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल आणि त्याचा वाढीसाठी उत्तम पर्याय शोधात असाल तर निश्चितच डिजिटल मार्केटिंग एक योग्य निर्णय राहील.
डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ? | What is Digita...
April 5, 2023 @ 6:50 am
[…] इंटरनेट (Internet) आणि त्यावरील प्लॅटफॉर्म चा वापर करून जेव्हा एखादा व्यवसाय हजारो लोकांपर्यंत पोहचवला जातो तेव्हा त्याला डिजिटल मार्केटिंग (Digital marketing) अस म्हंटल जाते. […]